हे ssss इथं

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर ” हे इथंच तर आहे”.
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही….बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक “हे इथच ” असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला….तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने “कुठं ?” विचारल्यावर ह्याने “हे ssss इथं ” सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं…

अजून एक किस्सा आठवला…पुण्यातला..

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर ” हे इथंच तर आहे”.
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही….बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक “हे इथच ” असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला….तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने “कुठं ?” विचारल्यावर ह्याने “हे ssss इथं ” सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं…

अजून एक किस्सा आठवला…पुण्यातला..
मी पुणे university त एका कामासाठी गेले होते आणि हवा तो विभाग कुठे आहे ते माहिती नसल्याने म्हंटल जरा विचारून सापडेल…तर एका इमारतीत गेले आणि एका प्यूनला विचारला…त्याने हि पुढची इमारत असं सांगितल्यावर “त्या पुढच्या ” इमारतीत गेले आणि पार अगदी तिसऱ्या मजल्यावर जाऊनसुद्धा कोणी कुत्रासुद्धा, माफ करा कुत्रे तिथं बरेच होते तेव्हा कोणीच माणूस सापडेना..म्हणून तसेच फिरत फिरत हि नाही ती असेल करीत आजूबाजूच्या इमारतीत गेले…त्यातल्याच एका ऑफिसातल्या बाईंनी एका इमारतीत जा सांगितले आणि कसं जायचं (म्हणजे इथून उजवीकडे मग डावीकडे )ते सांगितलं….मग तसं गेले…तर तिसऱ्याच ठिकाणी…शेवटी वैतागून म्हंटल एखाद्या विद्यार्थ्याला नाहीतर रस्त्यावरच्या कोणालातरी विचारावं आणि एक महाशय जे शिक्षक असू शकतात हि शंका आली त्यांना विचारलं…त्यांनी काही प्रश्न विचारून मला हवा तो विभाग कोणता आणि इथे कसं जायचं ते सांगितलं….इथे गेले…

जरा आत गेल्यावर लक्षात आलं कि पहिल्यांदा ज्या ठिकाणी (जिथून प्युनने “हि पुढची” सांगितलं ) तिथंच स्वारी परत आलेली. इतका संताप आला आणि मग हसू आलं. त्या प्युनला झापावं तर तो मेला कुठं दिसेना. तो विभाग तळात होता. मग तिथल्या एका ऑफिसात जाऊन एका तरुण प्रोफेसरला भेटले आणि काम सांगितलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजून एका ठिकाणी जायला सांगितलं. मी पत्ता विचारला तर इमारतीचं नाव देऊन महाशय म्हंटले कि “हि इथेच ए”. मग मात्र राहवलं नाही…” अहो काय लावलंय? इथ यायच्या आधी याच ठिकाणच्या एका प्युनने ती पुढची बिल्डींग म्हणून इथून पाठवलं. प्रत्येकजण हि इथंच ए करत होते आणि याच इमारतीभोवती गेला दीड एक तास तरी मी गोल गोल फिरतेय…जरा नीट सापडेल असं पत्ता सांगायला काय होतंय? ” असं वसकले.

असो,
पण एकंदरीत एखाद्याला आपला पत्ता सांगायचा नसेल किंवा घरी सहजासहजी किंवा अगदीच घरी येऊ द्यायचं नसेल तर बिनदिक्कत सांगावे “अरे त्यात काय मी हे sssssss इथच तर राहते/तो ” ,
त्याने शंका काढली कि “कसं यायचं?” तर जसं काही आपण अमिताभ बच्चनसारखे अगदी प्रसिद्ध आहोत असं भासवून
“अमुक अमुक स्टेशनावर ये आणि खाली उतरून कोणालाही विचार” किंवा ” अमुक अमुक बस स्टॉपवर उतर आणि कोणालाही विचार “,

आणि जर आपल्याला कोणी अशा पद्धतीचा पत्ता सांगितला तर समजावे की कोणालाच तो माणूस किंवा पत्ता माहिती नाही…अन आपली भरपूर पायपीट होणार आहे….इतके करूनही नशीब जोरावर असेल तरच पत्ता सापडेल …त्यामुळे असा कोणी पत्ता सांगत असेल तर त्यांनाच घरी बोलवावे आणि म्हणावे “एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो” आणि एकदम घाई असल्याचे किंवा बस आल्याचे किंवा अचानक कोणीतरी ओळखीचे पण खूप काळ न भेटलेले दिसले असे करावे आणि जरी आपल्याकडे त्या ह्या ओरिजिनल वेळखाऊचा फोन नंबर नसला तरी ” मी तुला फोन करतो/ते, आता खूप घाईत आहे ” वगैरे सांगून पळावे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *